Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 20 July 2019

वृक्षारोपण, वनभोजन व क्षेत्रभेट

विंचूर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लोणजाई येथे वृक्षारोपण, वनभोजन व क्षेत्रभेट..

विंचूर, १७ जुलै:- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोणजाई येथे 33 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत पंचायत समिती निफाड मार्फत आयोजित कार्यक्रमात सक्रिय सहभाग दर्शवला. याप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षक हरित सेना प्रमुख एन.बी.बोरसे, के.जी.जोपळे, ए.टी.वळवी व एस.एम.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 10 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले व समाजाला "झाडे लावा, झाडे जगवा" असा संदेश दिला. तद्नंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे वनभोजनाचा आनंद लुटला या कार्यक्रमाचे नियोजन सहलप्रमुख जे.पी.पाटील यांनी केले. तसेच गुरुकुल प्रकल्पांतर्गत इयत्ता सातवी ते दहावी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटी अंतर्गत पंचायत समिती निफाड मार्फत आयोजित या उपक्रमास भेट देऊन सक्रिय सहभाग नोंदवला व माहिती मिळवली. क्षेत्रभेटीचे नियोजन गुरुकुल प्रमुख एम.एस.निकम व क्षेत्रभेट प्रमुख पी.ए.सरोदे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, सेवकवृंद उपस्थित होते. वनभोजन,क्षेत्रभेट व वृक्षारोपण व्यवस्थितपणे पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार व डी.टी.जोरे तसेच संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे, अध्यक्ष व सदस्य स्थानिक सल्लागार शिक्षण समिती, ग्रामस्थ यांनी सर्वांचे अभिनंदन केले.



























No comments:

Post a Comment