विंचूर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी .............
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी इयत्ता १० वी अ च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. प्रथम अध्यक्ष निवडीची सूचना कु.श्रद्धा दरेकर हिने मांडली. त्यास श्रेयस पगारे याने अनुमोदन दिले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एन.ई.देवढे व व्यासपीठावरील मान्यवरांनी महर्षी व्यास व कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले. आयुष चव्हाण याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर विद्यार्थ्यानी प्राचार्य व सर्व सेवकांचे औक्षण केले व सर्वांचा सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यानंतर विद्यालयातील विद्यार्थी कु.आकांक्षा कातकाडे, सौरभ जाधव, कु.साक्षी पठाडे, अतिथ दिवटेे, कु.तेजस्विनी खाडे, कु.शिवानी सांगळे यांनी आपल्या मनोगतातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व व गुरुंबद्दल ऋण व्यक्त केले. यानंतर विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून गुरुपौर्णिमा का साजरी करतात याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तृणाली जाधव, मृणाल दिवटे, सत्यम सोनवणे, शिवानी सांगळे यांनी केले व आभार प्रदर्शन कु.कोमल मोरे हिने केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व सांस्कृतिक विभाग यांचे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डब्लू. एन. घोडके, पर्यवेक्षक एस. पी. पगार व डी. टी. जोरे, लाइफ वर्कर आर.के.चांदे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमास एस.पी गाडेकर, पी.एल.कोळी, ए.एन.साळुंके, व्ही.एस.कुलकर्णी, जे.व्ही.काळे, पी.ए.सरोदे, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment