Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 20 July 2019

गणवेश वाटप

विंचूर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांकडून गणवेश वाटप......

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील इयत्ता पाचवी व सहावी मध्ये शिकत असलेल्या दहा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सन 2001 व 2003 च्या इयत्ता दहावी व बारावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून गणवेशाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी राजेंद्र दरेकर, किरण तिडके, अमोल कल्याणकर, नितीन साळुंके, किरण क्षिरसागर, पंकज सरोदे, जयसिंग दरेकर, जयश्री देवचित्ते व ज्योती क्षिरसागर इ.माजी विद्यार्थी उपस्थित होते. शाळेविषयी नेहमी प्रेम व कृतज्ञता असलेल्या या सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, पर्यवेक्षक एस पी पगार, संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जे.पी.पाटील यांनी केले.


















No comments:

Post a Comment