Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 28 June 2019

वर्पे सर - सेवापूर्ती समारंभ


विंचूर विद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक उत्तम बाळाजी वर्पे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न...


विंचूर, दि.२८ जून :- विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक उत्तम बाळाजी वर्पे यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच संपन्न झाला. सर्वप्रथम अध्यक्षपदाची सूचना विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी यांनी मांडली त्यास सर्वानुमते अनुमोदन उपशिक्षक पंकज सरोदे यांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणे गुरुजी (सदस्य, उत्तर विभाग सल्लागार समिती, अहमदनगर) होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.संजय शेवाळे (पंचायत समिती सदस्य, निफाड) व मा. वसंत कवडे (प्राचार्य, ठाणगाव विद्यालय) उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर अण्णा व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले. याप्रसंगी ईशस्तवन व स्वागतगीताद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी केले. नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. तसेच वर्पे सरांचा सेवापूर्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तीबद्दल विद्यार्थी कु. कोयल साळवे व शुभम सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे, माजी प्राचार्य डी.सी.शेंडे, व्ही.एस. कवडे, प्राध्यापक एम.एन.क्षिरसागर, प्राध्यापक गांगड, के.बी.दरेकर, स्नेहल वर्पे, संजय शेवाळे, नारायणे गुरुजी यांनी वर्पे सरांच्या २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतील योगदान, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, व आठवणीतील प्रसंग आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले. यानंतर सत्कार मूर्ती  वर्पे सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समिती सदस्य  पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, बाळासाहेब ठोसर, सिताराम झिंजुर्डे, गंगाधर चव्हाण, आजी-माजी मुख्याध्यापक व रयतसेवक-  पी.वाय.कडाळे, बी.डी.निकाळजेव्ही.एम.सालगुडे, जी.जी.पोफळे, डी.यु.कापडणीस, एम.के.पिलगर, एन.पी. गवळी, ए.बी.कचरे, एस.बी.जाधव, जी.एन.तेलोरे, ग्रामस्थ- शंकर दरेकर, विनायक जेऊघाले, आबा दरेकर, माजी विद्यार्थी- किरण तिडके व सुदाम दरेकर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मान्यवर, नातेवाईक व आप्तेष्ठ उपस्थित होते. याप्रसंगी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ व  उपाध्यक्ष कैलास सोनवणे, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी व उपस्थित मान्यवरांनी वर्पे सरांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.





 






No comments:

Post a Comment