Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 28 June 2019

छत्रपती शाहू महाराज - जयंती (२६ जुन)

विंचूर विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी...


विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम प्रतिमापूजन संपन्न झाले. त्यानंतर दिव्या दरेकर, सोनल आव्हाड, साहिल दरेकर, प्रिती कदम, श्रुती डुंबरे, शुभम सोनवणे या विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.व्ही. मापारी होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक यू.बी. वर्पे, पी.बी.आहेर, ग्रामस्थ अण्णासाहेब दरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.कोयल साळवे हिने केले, तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक जे.पी.पाटील यांनी केले. याप्रसंगी तंबाखूमुक्त अभियानांतर्गत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी शपथ घेतली. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.के.एम.निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपप्राचार्य प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार, संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
 












 

No comments:

Post a Comment