Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 28 June 2019

आंतरराष्ट्रीय योग दिन- २१ जून


कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.............


            विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील जवळपास २५०० विद्यार्थी व ७० शिक्षकांनी योगासने करण्यात सहभाग घेतला. प्रथम आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक किशोर पाटील व त्यांचे सहकारी विजय लोहारकर, अविनाश सोनवणे व गजेंद्र शिंदे तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार व व्ही.व्ही.मापारी, संस्थेचे लाईफ वर्कर आर.के.चांदे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री.श्री.रवीशंकरजी व कर्मवीर आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर प्रशिक्षकांनी प्रार्थनेने योगासनास सुरुवात केली व विद्यार्थ्यांकडून पद्मासन, मकरासन, चक्रासन, हलासन, ताडासन, मयुरासन, धनुरासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, शीर्षासन आदी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. शेवटी शांतीपाठ व मेडीटेशन (ध्यानधारणा) नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी के.जी.जोपळे, ए.एच.पाटील, जे.पी.पाटील, यु.बी.वर्पे, पी.ए.सरोदे यांनी सहकार्य केले.






























No comments:

Post a Comment