विंचूर विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ......
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे महाराष्ट्र राज्य
परीक्षा परिषद, पुणे मार्फत आयोजित इ. ८ वी पूर्व
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कु.राऊत साक्षी,
वैभव जाधव व कु.कडलग सिद्धी हे ३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे इ. ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कु. भोसले शरयू व
कु. बोरसे श्रद्धा हे २ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थी, पालक व
त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच विभागप्रमुख सौ.सोनवणे जे.बी. व सौ.पवार
ए.ए. यांचे स्थानिक सल्लागार शिक्षण समिती अध्यक्ष श्री.काकासाहेब गुंजाळ,
उपाध्यक्ष श्री.कैलास सोनवणे, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य श्री.सुनिलभाऊ
मालपाणी व श्री.नारायणे गुरुजी, तसेच सदस्य श्री.पंढरीनाथ दरेकर, श्री.अनिल दरेकर,
श्री.बाळकिसन मालपाणी, श्री.जगदीश जेऊघाले, श्री.काशिनाथ शेवाळे तसेच विद्यालयाचे प्राचार्य
एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार व व्ही.व्ही.मापारी
, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment