Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 20 July 2019

वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी

वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी          दिनांक - २०/०७/२०१९


विंचूर विद्यालयात वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी कार्यक्रम संपन्न.............
                   विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्रथम गावातून वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी जनजागृती होण्यासाठी विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी तसेच पुस्तके व ग्रंथ यांचे महत्त्व समजावे म्हणून ग्रंथदिंडी काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या विविध वेशभूषा, कलश, वृक्षांची रोपे, ग्रंथ, घोषणाफलक व ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक संपन्न झाली. याप्रसंगी प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार, डी.टी.जोरे, यांनी दिंडीत सहभागी विद्यार्थी व शिक्षक हरितसेना प्रमुख एन.बी.बोरसे, जे.पी.पाटील, व्ही.सी.भोसले, एस.आर. वसावे, श्रीम.एस.एस.जोशी  ए.सी.पाटील, साळी, ग्रंथपाल पी.सी.शेलार यांचे अभिनंदन केले



























No comments:

Post a Comment