Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 20 July 2019

पालक- शिक्षक संघाची स्थापना..

विंचूर विद्यालयात पालक- शिक्षक संघाची स्थापना..........


उपाध्यक्षपदी श्री.विनायक जेऊघाले यांची निवड

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठीची पालक- शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. प्रथम अध्यक्ष निवडीची सूचना ए.एच.पाटील यांनी मांडली व त्यास सर्वानुमते अनुमोदन पी.ए.सरोदे यांनी दिले. नंतर कर्मवीर व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे यांनी केली. उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य नारायणे गुरुजी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष कैलास सोनवणे व सदस्य अनिल दरेकर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य एन.ई.देवढे, उपाध्यक्ष- विनायक जेऊघाले, सचिव- एस.एम.पवार, सहसचिव- सौ.आरती जाधव व प्रविण सालगुडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गुरुकुल प्रकल्प पालक- शिक्षक संघासाठी उपाध्यक्षपदी सौ.वंदनाताई दिवटे व सहसचिव पदी ज्ञानेश्वर दरेकर यांची देखील निवड करण्यात आली. याचबरोबर मागील वर्षाच्या कार्यकारणीचे आभार व नवीन कार्यकारिणीचे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डब्लू.एन.घोडके व पर्यवेक्षक एस.पी.पगार यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.  यानंतर विद्यालयातील गुरुकुल प्रमुख एम.एस.निकम यांनी गुरुकुल प्रकल्पाविषयी सखोल माहिती दिली. विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.टी.जोरे यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, विविध परीक्षांचे निकाल व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलची माहिती पालकांना दिली. तसेच पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. याप्रसंगी पी.के.जेऊघाले, विनायक महाले, शंकर दरेकर, आबा दरेकर, ललित दरेकर, सुरेश जाधव, बाबासाहेब आरगडे, सौ.मोनिका कल्याणकर, सौ.वाघ, सौ.देवरे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जे.पी.पाटील यांनी केले.



























































No comments:

Post a Comment