विंचुर विद्यालयातील गुरुकुल प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायत कार्यालयास क्षेत्रभेट........
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील इयत्ता पाचवी व सहावीच्या गुरुकुल प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट संपन्न झाली. या अंतर्गत विद्यार्थी व शिक्षक यांनी ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिसला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती मिळवली. सर्वप्रथम विंचूर ग्रामपालिकेचे ग्रामसेवक जी.टी.खैरनार यांनी ग्रामपंचायतीचे कार्य, रचना, विविध समित्या व त्यांचे कामकाज, योजना, कर आकारणी यासंबंधीची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली व त्यांचे शंकासमाधान केले. ग्रामपालिकेतर्फेे उपस्थित शिक्षकांचा व विद्यालयातर्फे ग्रामपालिकेतील सेवकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे, ग्रामपालिका मुख्य लिपिक बाळासाहेब चव्हाण, आर.पी.शिंदे, एस.एस.चव्हाण, टी.डी.जाधव, मनोज चव्हाण, सुरेश काळे, इस्माईल मोमीन उपस्थित होते. तसेच पोस्टमास्टर प्रविण भावसार व पोस्टल असिस्टंट प्रविण कोरडे यांनी पोस्टाचे व्यवहार, कामकाज आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा - जागरूकता अभियान याबद्दलची विस्तृत माहिती व पत्रके विद्यार्थ्यांना दिली. क्षेत्रभेटीचे नियोजन प्रमुख पी.ए.सरोदे, के.बी.पारधी, सौ.जे.बी.सोनवणे यांनी केले. शेवटी गुरुकुल प्रमुख एम.एस.निकम यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment