Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 20 July 2019

डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण....

विंचूर विद्यालयात डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण....

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये विंचूर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी डॉ.किशोर चौधरी, डॉ.काकासाहेब तासकर, डॉ.सुजित गुंजाळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.बी.काद्री यांनी कुपोषण, जागतिक तापमान वाढ व वृक्षांचे महत्व याबद्दल मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व डॉक्टर, शिक्षक, पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच संघटनेच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी व आरोग्यासाठी वॉटर फिल्टर देण्याचे आश्वासन देण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, विंचूर ग्रामपालिका उपसरपंच निरज भट्टड, सदस्य आत्माराम दरेकर, डॉ. भागवत गुंजाळ, सुजित गुंजाळ, संदीप पाटील, गोकुळ धुमाळ, शरद फड, मुश्ताक पठाण, राजेंद्र गायकवाड, सुभाष शेणगे, सचिन जेऊघाले, शैलेश काळे, रविंद्र भगत, चंद्रकांत ठाकरे, राजेंद्र कांगणे, सौरभ शेणगे, पत्रकार दीपक घायाळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी  मान्यवरांनी विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन.घोडके व संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे यांनी आभार मानले.





















No comments:

Post a Comment