Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 2 August 2019

लो.टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती

विंचुर विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्ल्यू एन घोडके, व विद्यार्थी यांनी प्रतिमापूजन केले. दिव्या दरेकर, आनंद क्षिरसागर, वेदांत जाधव, श्रद्धा जेऊघाले, वैभवी पवार, पल्लवी जाधव, सत्यम सोनवणे, जोएफ शहा यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी पर्यवेक्षक एस.पी.पगार, डी.टी.जोरे, लाइफ वर्कर आर.के.चांदे, प्राध्यापक एस.एन.शेवाळे, पी.बी.आहेर, एम.एन.क्षिरसागर, ज्येष्ठ शिक्षक के.जी.जोपळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जे.पी. पाटील यांनी केले.











No comments:

Post a Comment