Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 6 September 2019

शिक्षक दिन

विंचूर विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा - "विद्यार्थी बनले शिक्षक"


विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता १० वी च्या वर्गातील उस्फुर्त विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसभर मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिपाई म्हणून एक दिवस शाळेचे संपूर्ण कामकाज बघितले. इयत्ता १० वी मधील विद्यार्थिनी कु.तृणाली जाधव – मुख्याध्यापक, तन्मई चौरे – उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक म्हणून पुनम नेवगे आणि पूजा रांधवण यांनी कामकाज पाहिले. सकाळ व दुपार सत्रात अध्यापनाचे कामकाज पार पडले. त्यानंतर सभेचा व सत्कार समारंभ घेण्यात आला. सर्वप्रथम आदित्य चव्हाण याने अध्यक्ष निवडीची सूचना मांडली त्यास पुनम नेवगे हिने अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी भूषविले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृणाली जाधव हिने केले. त्यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थी शिक्षकांनी गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच याप्रसंगी  सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने  विद्यालयास  कलर प्रिंटर  भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके व पर्यवेक्षक सतीश पगार, ज्ञानदेव जोरे यांनी कौतुक केले. त्यानंतर सौरभ जाधव, निकिता सोनवणे, आरती दरेकर, मृणाल दिवटे, अश्विनी सानप, परिमल निकाळे, सत्यम सोनवणे, आयुष चव्हाण, साक्षी काळे यांनी शिक्षक दिनानिमित्त आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रुती पवार, प्रीती म्हस्कर, पायल सालगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तन्मई चौरे हिने केले. कार्यक्रमास उपशिक्षक काशीराम जोपळे , सुनिल पवार, विद्या कुलकर्णी, अरुण साळुंके, सुनिल गाडेकर, विजय भोसले, अमित वळवी, निलेश बोरसे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. माध्यमिकसाठी संस्थेचे लाईफ वर्कर राजेंद्र चांदे व उपशिक्षक पंकज सरोदे तर उच्च माध्यमिक वर्गासाठी प्राध्यापक संदीप शिंदे व सुनील शेवाळे यांनी शिक्षक दिनाचे नियोजन केले.




 





 






















































































































No comments:

Post a Comment