Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 6 September 2019

विभागीय कराटे स्पर्धांसाठी निवड

विंचूर विद्यालयातील विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील कराटे स्पर्धांसाठी निवड ....

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी नाशिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शिकाई मार्शल आर्ट  स्पर्धेत १७ वर्षा खालील 50 किलो वजनी गटात ज्ञानेश्वर काकड याने याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १९ वर्षाखालील कराटे स्पर्धेत सुरज गलांडे, मोईन आत्तार,  किर्ती देसले, विलास घोंगडे यांनी देखील उज्ज्वल यश संपादन केले.  या सर्वांची आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धांमध्ये ईशा कबाडी, अनिकेत गुजर, प्रथमेश कुसळकर, गौरव गाजरे यांनी देखील सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य एन ई देवढे, उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार, डी.टी.जोरे, संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे, क्रीडा प्रमुख के.जी.जोपळे, व्ही.सी.भोसले, टी.ए.पवार, एम.एम.पवार यांनी हार्दिक अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment