विंचूर विद्यालयात गोपाळकाला- दहीहंडी कार्यक्रम संपन्न.....
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात श्रीकृष्ण जन्म-गोपाळकाला निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधा यांची वेशभूषा परिधान केली. या कार्यक्रमात श्रद्धा जेऊघाले, आदिती गरड, रागिनी काळे, आयुष गाडे, साई गांगुर्डे, ओम पुंड, करण डोखे, राम जाधव, आदित्य जाधव, मानस घायाळ या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दहीहंडी फोडल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपशिक्षक जे.पी.पाटील यांनी श्रीकृष्ण जन्म व दहीहंडीचे महत्व आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. नंतर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन.घोडके, के.एम.निकम, ए.एस.पवार, पी.ए.सरोदे, एम.एम.पवार, ए.ए.पवार, के.बी.पारधी, बी.आर. नागणे, ए.एम.पवार, जे.बी.सोनवणेे, मोनिका दळवी, वैष्णवी साळी, कैलास घंगाळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, पर्यवेक्षक एस.पी.पगार, डी.टी.जोरे, संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment