Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 19 September 2019

हिंदी दिन

विंचूर विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा ……..


विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये १४ सप्टेंबर हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे होते. यानिमित्त विद्यालयातील  विद्यार्थिनी  तेजस्विनी थोरात, स्मृती पवार,  अनुजा गाडेकर,  सत्यम सोनवणे, निधी कचोळे,  ओमसाई पुंड,  प्रज्ञा राऊत,  भूमी चेवले,  अक्षरा बोरसे, पियुष नेवगे, शितल कुमावत, श्रावणी कांगणे  या विद्यार्थ्यांनी  विविध हिंदी कविता,  गाणी  याद्वारे आपले विचार मांडले. त्यानंतर विद्यालयाचे उपशिक्षक अरविंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवस का साजरा करतात?, त्याचे महत्त्व आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. तसेच संस्थेचे लाइफ वर्कर राजेंद्र चांदे यांनी विविध हिंदी साहित्यकार व हिंदी भाषेविषयीचे समज-गैरसमज याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यानिमित्त इ.८ वी गुरुकुल वर्गातील हस्ताक्षर स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुश्री दरेकर व ज्ञानेश्वरी आभाळे तर आभार प्रदर्शन वैष्णवी राऊत या विद्यार्थिनीने केले.  कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके, पर्यवेक्षक ज्ञानदेव जोरे व सतिश पगार, जेष्ठ्शिक्षक सुनिल गाडेकर, अरुण साळुंके, के.पी. रोठे, काशिराम जोपळे, विद्या कुलकर्णी, जगदीश पाटील, मिननाथ पवार, पंकज सरोदे, क्रांती निकम, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.



















No comments:

Post a Comment