विंचूर विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन.....
रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये नुकतेच विशाखा समिती, किशोरी उत्कर्ष मंच व कुमार अवस्थेतील मुलामुलींसाठी समुपदेशन समितीअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्यावतीने इयत्ता नववी व दहावीच्या किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका विद्या कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पर्यवेक्षिका सौ.वंदना खांदवे मॅडम यांनी किशोरवयीन मुलींच्या समस्या, स्वच्छतेचे महत्व, योग्य पोषण आहार इत्यादीबाबत मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी खांदवे मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले. कार्यक्रमासाठी उपशिक्षिका रेश्मा सरोदे, बालिका नागणे, स्मिता खरात यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment