Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 19 September 2019

गेम बेस्ड लर्निंग कार्यशाळा

 गेम बेस्ड लर्निंग व रयत नॉलेज बँक - कार्यशाळा

(रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय कार्यालय, अहमदनगर)



 रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय कार्यालय, अहमदनगर येथे रयत विज्ञान प्रकल्पांतर्गत गेम बेस्ड लर्निंग व रयत नॉलेज बँक संदर्भात दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी कार्यशाळा संपन्न झाली.  सर्वप्रथम कार्यशाळेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी मा.श्री. संजय नागपुरे साहेब, सहाय्यविभागीय अधिकारी मा.श्री. खंडेराव शेंडगे साहेब तसेच या कार्यशाळेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री.पंकज सरोदे (विंचूर), श्री तांबोळी आय.आय.(भाळवणी), श्री प्रशांत पगा(चांदोरी),  उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सर्व तज्ञ मार्गदर्शकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन संस्थेचे लाइफ वर्कर व विज्ञान प्रकल्पाचे मुख्य समन्वयक श्री. प्रशांत खंडागळे सर यांनी केले. याप्रसंगी विभागीय अधिकारी श्री.नागपुरे साहेब यांनी उपस्थित 123 शाखातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना रयत विज्ञान प्रकल्प संदर्भात आपला असलेला सहभाग व दर्जेदार साहित्य निर्मिती करण्यासंदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच आपण मिळवलेले ज्ञान हे आपल्या शाखातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना केली. शेवटी विभागीय सहाय्यक विभागीय अधिकारी शेंडगे साहेब यांनी सर्वांचे आभार मानले व उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यानंतर गेम गेम बेस्ड लर्निंग अंतर्गत विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील उपशिक्षक पंकज सरोदे यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना गेम बेस्ड लर्निंग संदर्भात ज्ञानरचनावाद, अध्ययनाच्या विविध पद्धती व गेम बेस्ड लर्निंग म्हणजे काय? यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रथम ज्ञानरचनावाद अंतर्गत आजचा विद्यार्थी, शिक्षकाचे कर्तव्य, आरटी 2009, आनंददायी शिक्षण पद्धती कशी असावी? ज्ञानरचनावाद म्हणजे काय? त्याचे फायदे, मर्यादा, गृहिते, तत्त्वे इ. स्पष्ट केली. त्याचप्रमाणे ज्ञानरचनावाद पद्धतीने वर्गात शिकवत असताना कोणकोणत्या पद्धतींचा वापर शिक्षकाने केला पाहिजे यासाठी पावर पॉइंट प्रेझेंटेशन व व्हिडिओद्वारे सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयोगात आणावयाच्या विविध अध्ययन पद्धती - जसे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, इंक्वायरी बेस्ड लर्निंग, प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, माईंड मॅप पद्धती, गेम बेस्ड लर्निंग या पद्धतींची  संकल्पना, माहिती,  फायदे  व वापर समजावून सांगितल्या. अखेरच्या टप्प्यात  गेम बेस्ड लर्निंग  या अंतर्गत  गेम्सचा  विविध क्षेत्रात होत असलेला वापर  व त्याचे फायदे तसेच  शिक्षण क्षेत्रात या पद्धतीचा वापर विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी कसा करावयाचा ? विविध विषयांतर्गत घटक व उपघटकानुसार कशा पद्धतीने विविध खेळ तयार करावयाचे? खेळातून विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणती कौशल्य निर्माण होतील? याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच विविध साहित्य, हातवारे, गाणी, संवाद, व्हिडिओ, प्रेझेंटेशन, सॉफ्टवेअर यांचा वापर करून नवनवीन गेम्स विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व उपस्थित शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन गेम बेस्ड लर्निंग संदर्भात सर्व माहिती जाणून घेतली. आपल्या शंका व समस्या यांचे विविध प्रश्नांद्वारे समाधान करून घेतले. कार्यशाळेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी श्री.तांबोळी आय.आय. सर (भाळवणी) यांनी देखील याकामी अनमोल असे सहकार्य केले.
यानंतर श्री प्रशांत पगार यांनी रयत नॉलेज बँक संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले. रयत नॉलेज बँकेसाठी प्रत्येक शाखेतील शिक्षकांनी करावयाच्या पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन व त्याच्या फॉरमॅट बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच पीडीएफ, व्हिडिओ व इतर ई लर्निंग साहित्य कसे तयार करावयाचे? यासंबंधी विस्तृत असे मार्गदर्शन केले. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यशाळेचा समारोप करण्यात आला


























No comments:

Post a Comment