विंचूर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३२ वी जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक....
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कर्मवीरांच्या मुख्य रथाचे व प्रतिमेचे पूजन विंचूर ग्रामपंचायत सरपंच ताराबाई क्षिरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर गावातून कर्मवीरांच्या प्रतिमेची ढोल – ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध समाजप्रबोधनपर देखावे दाखविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने लेझीम पथक, कलशधारी विद्यार्थिनी, वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी, रिंगपथक, डम्बेल्स, घुंगुरकाठी, लेक वाचवा, शेतकरी वाचवा, स्त्री-भृणहत्या, स्वच्छता अभियान, सर्व धर्म समभाव, अंधश्रद्धा निर्मुलन, विविध देशभक्त, संत, देव यांचे देखावे , इंधन वाचवा, भजनी मंडळ, वारकरी दिंडी अशा विविध देखावे, रथ व टिपरी व आदिवासी नृत्यांचा समावेश होता. मिरवणुकीनंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, पंढरीनाथ दरेकर, नारायणे गुरुजी, अनिल दरेकर, ग्रामस्थ पी.के.जेऊघाले, विनायक जेऊघाले, केशव क्षिरसागर, बाबा आरगडे, शंकर दरेकर, आबा दरेकर, दिनकर चव्हाण, सतीश शेलार, शांताराम दरेकर, सुदाम दरेकर, योगेश गायकवाड, किरण तिडके, प्रकाश कानडे, मच्छिंद्र सोनवणे, संपत क्षिरसागर, ज्ञानेश्वर जाधव, केदू मुदगुल, वाल्मिक डुंबरे, कैलास मुदगुल, देविदास मुदगुल, दत्तात्रय सोमवंशी, पोपट जाधव, भाऊसाहेब डुंबरे, स्नेहल साळी, सविता सोमवंशी, सुनिता काळे, उपस्थित होते. मिरवणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे, उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके, पर्यवेक्षक सतिश पगार, ज्ञानदेव जोरे, लाईफ वर्कर राजेंद्र चांदे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक –शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment