विंचूर विद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन ....
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार देवढे यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी प्राथमिक व माध्यमिकच्या आदिती गरड, योगेश देवकर, रागीनी काळे, विवेक डुंबरे, मैथिली ठुबे, कृष्णा बोडके, अस्मिता आघाव, श्रेयस बढे, सत्यम शिळमकर, सोनाक्षी आघाव, आर्या जगताप इत्यादी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तसेच विद्यालयातील उपशिक्षक गणेश पाडवी व विश्वास गावित यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. भक्ती जेऊघाले व इंद्रायणी शेलार या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन उपशिक्षक जगदीश पाटील यांनी केले. या कार्यक्रमास उपशिक्षिका अरुणा पवार, रेश्मा सरोदे, जयश्री सोनवणे, अनुराधा पवार, स्मिता खरात, अर्चना पाटील, वर्षा पवार, प्रीती सोनवणे तसेच शिक्षक सुनिल गाडेकर, सुनिल पवार, विजय भोसले, अशोक खरात, लक्ष्मण गायकर, संजय गांगुर्डे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment