Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 5 October 2019

कर्मवीर जयंती सभेचा कार्यक्रम

आजच्या मुलामुलींनी सोशल मिडीयाचा योग्य वापर करण्याची गरज- पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे


विंचूर, २८ सप्टे – इंटरनेटचा अतिवापर व सोशल मिडियामुळे होत असलेले फसवणुकीचे प्रकार व गुन्हे यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आजच्या विद्यार्थ्यांनी सोशल मिडिया, इंटरनेट, मोबाईल यांचा योग्य वापर करावा असे प्रतिपादन शिर्डी पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले. विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३२ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यालयाची प्रगती व विकासाच्या अहवालाचे वाचन आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी मांडले. यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा वाचनीय पुस्तक, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार समारंभ संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये झालेल्या विविध परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण कार्यक्रम याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी रंगनाथ तासकर – अभियंता पुणे म.न.पा. यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व सुप्रसिध्द कवी प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर यांनी आपल्या विविध कविता, उदाहरणे व दाखले यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले व कर्मवीरांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाइफ वर्कर राजेंद्र चांदे व उपशिक्षिका बालिका नागणे यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके यांनी केले. या कार्यक्रमास विंचूर ग्रामपंचायत सरपंच ताराबाई क्षिरसागर, पं.स.सदस्य संजय शेवाळे, स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष कैलास सोनवणे, सदस्य सुनिल मालपाणी, पंढरीनाथ दरेकर, नारायणे गुरुजी, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, प्रतिष्ठीत ग्रामस्थ साधनाताई जाधव, राजाभाऊ दरेकर, भास्कर परदेशी, उषाताई राऊत, आत्माराम दरेकर, पप्पू शेख, शांताराम दरेकर, सचिन दरेकर, अर्चना दरेकर, डॉ.रमेश सालगुडे, पी.के.जेऊघाले, ज्ञानेश्वर गाडे, ज्ञानेश्वर तासकर, संजय घायाळ, आबा दरेकर, केशव क्षिरसागर, प्रविण सालगुडे, किशोर नेवगे, पी.वाय.कडाळे, प्रविण ढवण, पोपट क्षिरसागर, रामनाथ दरेकर, प्रताप दरेकर, सी.जी.बागुल, एस.के.आहेर, शरद महाजन, गोपिनाथ खैरे, ज्ञानेश्वर दरेकर, संतोष गोरे, युसुफ पठाण, सतिश शेलार, भाऊसाहेब आहेर, अमोल कल्याणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.





















No comments:

Post a Comment