विंचूर विद्यालयात पावसाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन.....
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पावसाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थी वयोगटानुसार तीन विभागांमध्ये इयत्ता पाचवी ते बारावी अखेर कबड्डी व खो-खो या मैदानी स्पर्धां अतिशय उत्साहात पार पडल्या. क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके, पर्यवेक्षक सतिश पगार व ज्ञानदेव जोरे, लाइफ वर्कर राजेंद्र चांदे, उपशिक्षक - काशिनाथ जोपळे, जगदीश पाटील, मिननाथ पवार, विजय भोसले, अरविंद पाटील, महेश निकम, पंकज सरोदे, मुश्ताक शेख, संदीप वसावे, वीरेंद्र कांबळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. स्थानिक सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांनी विद्यालयाच्या या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment