Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 22 December 2019

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन

*विंचूर विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.......*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर कु.वैभवी पवार या विद्यार्थीनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कु.पूनम बुचुकले व कु.श्रावणी थोरात यांनी गीत गायन केले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी.बी.आहेर व कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व राजकीय कार्य तसेच संविधान निर्मितीतील योगदान आपल्या मनोगतातून व्यक्त केले.  याप्रसंगी प्राध्यापक सुनिल शेवाळे, मच्छिंद्र क्षिरसागर, पंकज सरोदे, कैलास पारधी, मीननाथ पवार, ए.डी. चितुडकर, उपशिक्षिका क्रांती निकम, अनुराधा पवार, जयश्री सोनवणे, ज्योती शिंदे, अर्चना पवार, बापू खरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कु.कोयल साळवे केले.

No comments:

Post a Comment