*"करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे." - उद्धव भालेराव*
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात कलाकार व विद्यार्थी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उद्धव भालेराव यांनी विविध लोककला, गाणे, पोवाडे, भजन व भारुडे विद्यार्थ्यांसाठी सादर केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन, शिक्षकांची त्यांना घडविण्यासाठीची तळमळ, आई-वडिलांच्या त्यांच्याकडून असलेल्या आशा-आकांक्षा इत्यादीबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. तसेच पर्यावरण व वृक्षारोपण याबाबत जाणीव जागृती केली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे शंकानिरसन केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे, उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके, पर्यवेक्षक सतीश पगार, ज्ञानदेव जोरे, ज्येष्ठ शिक्षक पोपट आहेर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सर्व नियोजन आणि आभार प्रदर्शन उपशिक्षिका अरुणा पवार यांनी केले.

No comments:
Post a Comment