Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 1 December 2019

महात्मा ज्योतिराव फुले - पुण्यतिथी

*विंचूर विद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन.......*


विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार देवढे यांच्याहस्ते हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. यानंतर विद्यालयातील सिद्धांत राऊत, प्रीती कदम, अस्मिता सानप, समिक्षा देसले, यश आघाव, सत्यम सोनवणे या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव यांच्या जीवनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे उपशिक्षक जगदीश पाटील यांनी ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके, पर्यवेक्षक सतीश पगार, ज्ञानदेव जोरे, लाइफ वर्कर राजेंद्र चांदे, शिक्षक काशीराम जोपळे, कचरू रोठे, सुनिल पवार, पंकज सरोदे, ज्योती शिंदे, स्मिता खरात, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती गरड , तनुश्री दरेकर, तेजस्विनी थोरात व आभार प्रदर्शन भक्ती चांदोरे या विद्यार्थिनींनी केले.








No comments:

Post a Comment