Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 1 December 2019

संविधान दिन

*विंचूर विद्यालयात संविधान दिन साजरा.......*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर-संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष चव्हाण यांनी केले. तसेच सत्यम सोनवणे, श्रुती डुंबरे, प्रीती कदम या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके यांनी भारतीय संविधान निर्मितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यालयाचे कलाशिक्षक वीरेंद्र कांबळे यांनी संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी पर्यवेक्षक सतीश पगार, ज्ञानदेव जोरे, उपशिक्षक काशीराम जोपळे, सुनिल पवार, कचरू रोठे, प्राध्यापक सुनिल शेवाळे, पोपट आहेर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जगदीश पाटील यांनी केले.




























No comments:

Post a Comment