Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 22 December 2019

स्थानिक कलाकार व विद्यार्थी संवाद

*"गायनाचे रंगी, शक्ती अद्भुत हे अंगी"- सौ मोनिका कोळपकर*
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात स्थानिक कलाकार व विद्यार्थी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सौ.मोनिका कोळपकर यांनी विविध भावगीते, भक्तिगीते, भजन व अभंग विद्यार्थ्यांसाठी सादर केले. या माध्यमातून मुलांचे स्वप्न, यशस्वी होण्यासाठी करावयाचे प्रयत्न, त्यासाठी आई-वडील व शिक्षक यांचे योगदान इ.बाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे, उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके, पर्यवेक्षक सतीश पगार, ज्ञानदेव जोरे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सर्व नियोजन आणि आभार प्रदर्शन उपशिक्षिका अरुणा पवार यांनी केले.






No comments:

Post a Comment