*उत्तम आरोग्यासाठी योगाभ्यास महत्त्वाचा... - स्वामी दत्तानंद सरस्वती*
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये बोकडदरे येथील भारत माता आश्रमातील स्वामी दत्तानंद सरस्वती यांनी इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना योगासने व प्राणायाम याबद्दल मार्गदर्शन केले . याप्रसंगी अनुलोम- विलोम, कपालभाती, श्वासावर आधारित प्राणायाम तसेच विविध शारीरिक व्यायाम व योगासने यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके, उपशिक्षक जगदीश पाटील, मीननाथ पवार, पंकज सरोदे, वसंत गावित, अर्चना पवार, अनुराधा पवार, क्रांती निकम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment