Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 4 January 2020

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

*तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विंचूर विद्यालयाचे सुयश.....*                   
        कसबे सुकेणे ता.निफाड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पल्लवी जाधव, प्रांजल दरेकर व साक्षी नेवगे या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळवीत उज्ज्वल यश संपादन केले. त्यांनी तयार केलेले कांदा टिकविण्यासाठीचे आधुनिक कांदा चाळीचे उपकरण नववी ते बारावी या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचे ठरले. या विद्यार्थिनींना विद्यालयाचे प्राध्यापक एस.एन. शेवाळे, एस.व्ही.निकम व जे.पी.दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष  कैलास सोनवणे, सल्लागार समितीचे सदस्य सुनिल मालपाणी, नारायण गुरुजी, सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व हितचिंतक यांनी अभिनंदन केले.






No comments:

Post a Comment