*विंचूर विद्यालयात विविध गुणदर्शन (सांस्कृतिक) कार्यक्रम संपन्न............*
विंचूर, दि.30 डिसें.2019- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रम (सांस्कृतिक) उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक लासलगाव- खंडेराव रंजवे, गटशिक्षणाधिकारी निफाड- केशवराव तुंगार, विस्तार अधिकारी- वसंत गायकवाड उपस्थित होते. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन द्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी रंजवे साहेब यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व मोबाईल यापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच तुंगार साहेब यांनी आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते, कोळीगीत, शेतकरी आत्महत्या, बेटी बचाव, शिवराज्याभिषेक, सर्व धर्म समभाव, आई-वडीलांचे महत्व, पोवाडा, गायन, नाटिका, नृत्य अविष्कार सादर केले. परीक्षक म्हणून वैशाली दिघे व जितेंद्र आहिरे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी विंचूर ग्रामपंचायत सरपंच वंदनाताई कानडे, सदस्य भास्करराव परदेशी, नंदिनी क्षिरसागर, सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, पी.के.जेऊघाले सर, विनायक जेऊघाले, आबा दरेकर, शंकर दरेकर, अशोक दरेकर, प्रविण ढवण, कैलास पाटील, अण्णासाहेब आव्हाड, अरुणा राऊत, मंदाकिनी आहिरे, ग्रामस्थ, हितचिंतक, माता-भगिनी, पत्रकार, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या कुलकर्णी, राजेंद्र चांदे, बालिका नागणे, यांनी केले. उपस्थित सर्व आणि कार्यक्रमासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचे उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी के.जी.जोपळे, व्ही.जे.कांबळे, ए.एच.पाटील, एम.एस.निकम, एम.एम.पवार, पी.ए.सरोदे, के.एम.निकम, जे.व्ही.काळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment