विंचूर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.................
विंचूर , ३१ डिसेंबर :- विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. प्रथम कार्यक्रमासाठी अध्यक्ष निवडीची सूचना उपशिक्षक पंकज सरोदे यांनी मांडली व त्यास अरविंद पाटील यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पंढरीनाथ दरेकर होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक च्या कार्यकारी संचालिका शेफालीताई भुजबळ, सामाजिक कार्यकर्त्या वेदिका होळकर, नवनियुक्त न्यायाधीश तसेच विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कु.रेणुका राहतेकर व त्यांच्या मातोश्री अरुणा राहतेकर या होत्या. प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी केले. नंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील वर्षभरातील विविध स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग, तालुका, जिल्हा, विभाग, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा व रयत गुरुकुल प्रकल्पातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व मेडल अशा स्वरूपात पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमातील वैयक्तिक व सामुहिक प्रकारातील विजेते संघ व वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. विद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार इयत्ता १० वी अ मधील विद्यार्थी आयुष चव्हाण यास पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी शेफालीताई भुजबळ व रेणुका राहतेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी यशस्वी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी सर्व पारितोषिके उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी यांच्या वतीने दिली गेली. तसेच कार्यक्रमास आर्थिक हातभार लावणारे सर्व दानशूर व्यक्तींचे यावेळी आभार मानण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य नारायणे गुरुजी, अनिल दरेकर, शंकर दरेकर, विनायक जेऊघाले, रणजीत गुंजाळ, पंढरीनाथ जेऊघाले, ज्ञानेश्वर गाडे, अशोक दरेकर, दिलीप चव्हाण, जयंत साळी, सोहेल मोमीन, पत्रकार नितीन गायकवाड, स्नेहल साळी, मंदाकिनी आहिरे, शकुंतला जगदाळे, प्राथ.विद्यामंदिरचे मुख्याध्यापक आण्णासाहेब आव्हाड, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे व बालिका नागणे यांनी केले.
No comments:
Post a Comment