*विंचूर विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.....*
विंचूर 3 जाने.:- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती-बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कावेरी क्षिरसागर हीने सावित्रीबाईंची वेशभूषा केली. सिद्धांत राऊत याने पोवाडा सादर केला. तद्नंतर वेदांत जाधव, सोनाली कडलग, एंजल चव्हाण, प्राची गवारे, तेजल भडांगे, पुनम बुचकुले, श्रावणी थोरात, सृष्टी सालकाडे, वैभवी पवार, या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर भाषणे सादर केली. तसेच प्राध्या.पोपट आहेर, मच्छिंद्र क्षिरसागर यांनी सावित्रीबाईंचे स्त्री शिक्षणासाठीचे कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले.विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी अध्यक्षीय भाषण केले. विद्यालयाचे उपशिक्षक जगदीश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन रिदा शेख या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके, संदीप शिंदे, सुनील शेवाळे, पंकज सरोदे, क्रांती निकम, जयश्री सोनवणे, अनुराधा पवार, अर्चना पवार, बालिका नागणे, गुलाबचंद केंग शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment