Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 12 January 2020

वाहतूक सुरक्षा सप्ताह (रेझिंग डे )

विंचूर विद्यालयात वाहतूक सुरक्षा सप्ताह (रेझिंग डे ) साजरा....

विंचूर 7 जाने : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी लासलगाव पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.खंडेराव रंजवे साहेब यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, वैयक्तिक व सामाजिक सुरक्षितता याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सायबर गुन्हे, मोबाइलवरील आक्षेपार्ह मेसेज, लैंगिक छळ प्रतिबंध, कायदे व न्यायव्यवस्था याविषयी उद्बोधन केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना तोडरमल व गोपनीय विभाग सदस्य प्रदीप आजगे यांनी रेझिंग डे सप्ताहानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांना माहिती पुस्तिकांचे  वाटप केले. विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  कार्यक्रमप्रसंगी उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके, पर्यवेक्षक ज्ञानदेव जोरे, सतीश पगार, उपशिक्षक काशीराम जोपळे, विजय भोसले, अरविंद पाटील, मीननाथ पवार, तात्यासाहेब पवार, पंकज सरोदे,  पंकज गाडे, वैशाली दिघे, जयश्री काळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे तर आभार प्रदर्शन जगदीश पाटील यांनी केले.















No comments:

Post a Comment