*विंचूर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..*
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच स्काऊट गाईड चे ध्वजारोहण भास्करराव परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाले. एमसीसी संचलन द्वारे राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यानंतर गावातून विविध घोषणा व ढोलताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. या कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समिती सदस्य जगदीश जेऊघाले, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे व ग्रामस्थ विनायक जेऊघाले, शंकरराव दरेकर, दिनकर चव्हाण, के.के.जेऊघाले, पी.के.जेऊघाले, सी.जी.बागुल, आबा दरेकर, ज्ञानेश्वर गाडे, किरण नवले, मधुकर पाडवी, योगेश भगत, राजेंद्र पोतले, सुनिल क्षिरसागर, जनार्दन चव्हाण, जगदीश चव्हाण, हरीश कांगणे, मंदाकिनी आहेर, अनिता सोनवणे, स्वाती जोशी उपस्थित होते. विंचूर ग्रामस्थ दिलीप धात्रक यांनी विद्यालयास याप्रसंगी 21 हजार रुपयांची देणगी दिली. कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment