*विंचूर विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा......*
विंचूर- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मराठी कवी वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. त्यानंतर वेदांत जाधव, प्रांजल गांगुर्डे, पूर्वा शेलार, प्रज्ञा राऊत, समिक्षा ढवण, प्रिती कदम, सिद्धांत राऊत यांनी मराठी राजभाषा दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर अक्षरा शेलार, श्रद्धा जेऊघाले, दिव्या दरेकर, वेदश्री नारायणे या विद्यार्थिनीनी मराठी थोरवीबद्दल गीत गायन केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक पोपट आहेर यांनी मराठी भाषेचे महत्व व मराठी राजभाषा दिनाच्या आपल्या मनोगतातून सर्वाना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके, मच्छिंद्र क्षिरसागर, सुनिल शेवाळे, सविता गंधे, कैलास पारधी, अर्चना पवार, वसंत गावित, जगदीश पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रायणी शेलार व प्रणाली थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन दिव्या कुमावत हिने केले.







No comments:
Post a Comment