Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 23 February 2020

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

*विंचूर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी...*

            विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम अध्यक्ष निवडीची सूचना कांचन बिबे हिने मांडली. त्यास वैशाली लांडबले हिने सर्वानुमते अनुमोदन दिले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैताली बिबे हिने केले. त्यानंतर श्रावणी दरेकर, दिव्या दरेकर, अनुजा गाडेकर, तेजस्विनी थोरात, अक्षदा शेलार, पायल भडांगे, श्रुती डुंबरे, वैष्णवी जाधव, प्रणाली थोरात, श्रावणी थोरात, सोनाली कडलग या विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या जीवन कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शितल हरळे, साक्षी हरळे, वेदांत जाधव, पुनम बुचकुले, सानिका मुदगुल यांनी शिवरायांवर पोवाडे सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे, संस्थेचे लाइफ वर्कर राजेंद्र चांदे, प्रमुख पाहुणे प्रविण ढवण, प्राध्यापक पोपट आहेर, संदीप शिंदे, विजय भोसले, सुनिल पवार, अरविंद पाटील, मीननाथ पवार, महेश निकम, पंकज सरोदे, जयश्री काळे, स्मिता खरात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी दरेकर व साधना निकम या विद्यार्थिनींनी केले. शेवटी आभार प्रदर्शन उपशिक्षक जगदीश पाटील यांनी केले.






















No comments:

Post a Comment