Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 1 August 2020

इ.१०वी एस.एस.सी. परीक्षा निकाल 2020

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची इ.१०वी एस.एस.सी. परीक्षा निकालाची यशस्वी परंपरा कायम....

    विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता १० वी मार्च २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी एकूण ३१८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यापैकी १४५ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ९८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व १० विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल ९६.८५% लागला. विद्यालयात  प्रथम- दरेकर माधुरी यशवंत (४८० गुण/ ९६.००%),  द्वितीय- शेलार सृष्टी राजेंद्र (४७६ गुण/९५.२०%), तृतीय- चव्हाण आयुष किशोर व जाधव तृणाली रविंद्र (४७२ गुण/९४.४०) या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.
            सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शक शिक्षकांचे स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिलभाऊ मालपाणी व नारायणे गुरुजी, सदस्य पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, बाळकिसन मालपाणी, जगदीश जेऊघाले, काशिनाथ शेवाळे, पालक-शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पत्रकार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्लू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार व डी.टी.जोरे., लाईफ वर्कर आर.के.चांदे, वर्गशिक्षक एस.पी.गाडेकर, व्ही.सी.भोसले, ए.टी.वळवी, एन.बी.बोरसे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment