Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 15 June 2022

नवीन विद्यार्थी प्रवेशोत्सव

 *विंचूर विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा....*


विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये नवीन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयात उपस्थित मान्यवरांचे व नवीन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुस्तकाचे वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ व विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी यावेळी आपल्या मनोगतातून उपस्थित विद्यार्थी, पालक व सर्व शिक्षक वृंद यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य जगदीश जेऊघाले, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, शिक्षणप्रेमी भाऊसाहेब निकम, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक के.जी.जोपळे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे लाइफ मेंबर आर.के चांदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डी.टी. जोरे यांनी केले.

































No comments:

Post a Comment