Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 29 June 2022

इयत्ता बारावी निकाल

 *विंचूर विद्यालयाचा इयत्ता १२ वी कला व विज्ञान शाखेचा १०० % निकाल.....*


            विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता 12 वी मार्च 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये विज्ञान विभागात एकूण 186 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 21 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, 143 विद्यार्थी प्रथम श्रेणी व 22 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत प्रथम क्र.: - कु. दरेकर माधुरी यशवंत 537 गुण  = 89.50 %, द्वितीय क्र:- पवार श्रुती सुनिल- 532 गुण = 88.67 %, तृतीय क्र.:- कु. दिवटे मृणाल विनोद - 515 गुण =  85.83  % यांनी उत्तम यश संपादन केले. त्याचप्रमाणे कला विभागात एकूण 155 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 11 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, 75 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 57 विद्यार्थी द्वितीय श्रेणी व 2 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शाखेत प्रथम क्र.:- कु. ठुबे कावेरी आनंदा -532 गुण = 88.67 %, द्वितीय क्र. :- कु. वाघ वैष्णवी संजय -503  गुण =83.83 %, तृतीय क्र.:- कु. निकम पूजा जनार्दन -490 गुण = 81.67 % यांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक, वर्गशिक्षक यांचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष कैलास सोनवणे, सदस्य पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मान्यवर, पत्रकार तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, संस्थेचे लाइफ मेंबर आर.के.चांदे, पर्यवेक्षक डी.टी. जोरे व के.जी. जोपळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.








No comments:

Post a Comment