*विंचूर विद्यालयाचा इयत्ता १० वी चा ९६.२२ % निकाल.....*
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता 10 वी मार्च 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये एकूण 318 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 156 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, 107 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 41 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व 02 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवून यश संपादन केले. विद्यालयात प्रथम क्र.: - कु. दरेकर श्रावणी सुभाष 468 गुण = 93.60 %, द्वितीय क्र:- महाले सायली सोमनाथ- 459 गुण = 92.80 %, तृतीय क्र.:- कु. दरेकर धनश्री विनायक - 455 गुण = 92.40 % यांनी उत्तम यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक, वर्गशिक्षक यांचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष कैलास सोनवणे, सदस्य पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मान्यवर, पत्रकार तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, संस्थेचे लाइफ मेंबर आर.के.चांदे, पर्यवेक्षक डी.टी. जोरे व के.जी. जोपळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment