Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 29 June 2022

आंतरराष्ट्रीय योग दिन

 कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.............


            विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील जवळपास २५०० विद्यार्थी व ७० शिक्षकांनी योगासने करण्यात सहभाग घेतला. प्रथम आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक किशोर पाटील, विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे यांनी कर्मवीर आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर प्रशिक्षकांनी प्रार्थनेने योगासनास सुरुवात केली व विद्यार्थ्यांकडून पद्मासन, मकरासन, चक्रासन, हलासन, ताडासन, मयुरासन, धनुरासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, शीर्षासन आदी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. शेवटी शांतीपाठ व मेडीटेशन (ध्यानधारणा) नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षक व्ही.सी.भोसले यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
















No comments:

Post a Comment