Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 23 July 2022

लोकमान्य टिळक जयंती व वृक्षारोपण

 *विंचूर महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण...*


विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त हरित सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन करण्यासाठी मैत्री गृप तयार करून एक एक झाड दत्तक घेऊन त्यांची लागवड करून वृक्ष संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. याप्रसंगी विद्यालयाची हरितसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करून सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यालयाचे प्राचार्य एन. ई. देवढे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संदेश तर संस्थेचे लाईफ मेंबर आर. के. चांदे यांनी पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून सांगितले. महाविद्यालयाचे हरितसेना प्रमुख  बी. एम. बैरागी यांनी सर्वांना पर्यावरण शपथ दिली. कार्यक्रमास उपप्राचार्य  आर. व्ही. शिंदे, पर्यवेक्षक  डी. टी. जोरे व  के. जी. जोपळे, प्राध्यापक एस. एन. शेवाळे, आर. टी. टिळेकर, बी. के. जाधव, एस. डी. शिंदे, एस. व्ही. निकम, सी. व्ही. अहिरे, माध्यमिकचे हरित सेना प्रमुख एन. बी. बोरसे, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.












No comments:

Post a Comment