Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 16 August 2022

गुरुकुल - क्षेत्रभेट

 *विंचूर विद्यालयातील विद्यार्थ्यांची गुरुकुल प्रकल्पांतर्गत क्षेत्रभेट संपन्न......*

  विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील रयत गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट नुकतीच संपन्न झाली. या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटी अंतर्गत रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिलभाऊ मालपाणी यांच्या खताच्या दुकान व गोदामास भेट दिली. विद्यालयातील बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी खतांचे विविध प्रकार, रासायनिक खते, त्यांचा वापर, वापराची गरज व पद्धती, फायदे, तोटे, दुष्परिणाम व त्यासंबंधीची विस्तृत माहिती मिळवली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे व शंकांचे सुनिलभाऊ मालपाणी यांनी आपल्या मार्गदर्शनातून निरसन केले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.टी. जोरे, गुरुकुल प्रमुख एम.एस.निकम, क्षेत्रभेट प्रमुख पी.ए.सरोदे व विद्यार्थी उपस्थित होते. क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना केलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी सुनिलभाऊ मालपाणी यांचे आभार मानले.





















No comments:

Post a Comment