Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday 17 July 2022

शिक्षक पालक सहविचार सभा व शालेय समित्या कार्यकारिणी निवड

 *विंचूर विद्यालयात पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न......*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये पालक-शिक्षक सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर अण्णा व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यालयाचा मागील वर्षाचा निकाल, तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश, पालक शिक्षक संघाची कार्यपद्धती, विद्यार्थी शिस्त तसेच पालकांच्या विविध शंका व समस्यांचे समाधान केले. या सभेत विद्यालयातील विविध समित्या - पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती आणि गुरुकुल पालक शिक्षक संघ यांची कार्यकारीणी निवडण्यात आली. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष- ज्ञानेश्वर गाडे, सचिव-सुनिल पवार, सहसचिव-अमजद पठाण, माता पालक संघाचे -उपाध्यक्षा- रुकसार शेख, सचिव- विद्या कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- पंढरीनाथ दरेकर, सचिव- अशोक खरात, शाळा व्यवस्थापन विकास समितीचे उपाध्यक्ष- सोमनाथ निकम, सचिव- सुनिल पवार तसेच गुरुकुल पालक शिक्षक संघ उपाध्यक्षपदी अशोक दरेकर, सचिव- महेश निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका व जबाबदारी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आपल्या मनोगतातून केले. या सभेसाठी स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष- कैलास सोनवणे, सदस्य- पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ- पंढरीनाथ जेऊघाले, विनायक जेऊघाले, शंकर दरेकर, प्रविण सालगुडे, आबासाहेब दरेकर, प्रविण ढवण, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शिंदे आर.व्ही., पर्यवेक्षक जोरे डी.टी., जोपळे के.जी., सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , तसेच मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे लाईफ मेंबर राजेंद्र चांदे यांनी केले.




































No comments:

Post a Comment