Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday 17 July 2022

गुरुपौर्णिमा

 विंचूर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी .............

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी इयत्ता १० वी अ च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. प्रथम अध्यक्ष निवडीची सूचना कु. वैष्णवी राऊत हिने मांडली. त्यास प्रांजल जेऊघाले हिने अनुमोदन दिले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक शिंदे आर.व्ही. व व्यासपीठावरील मान्यवरांनी महर्षी व्यास व कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले. अनुजा गाडेकर हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  त्यानंतर विद्यार्थ्यानी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे औक्षण केले व सर्वांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यानंतर विद्यालयातील विद्यार्थी शिवानी दरेकर, अभिषेक वाघ, मंथन शिरसाठ, यश आघाव, तनुश्री दरेकर, दीपिका उगले यांनी आपल्या मनोगतातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व व गुरुंबद्दल ऋण व्यक्त केले. यानंतर विद्यालयाचे उपशिक्षक व्ही.सी.भोसले यांनी आपल्या मनोगतातून गुरुपौर्णिमा का साजरी करतात याविषयी माहिती दिली. उपमुख्याद्यापक आर.व्ही.शिंदे यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी थोरात व ओमकार जाधव यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन आरती दरेकर हिने केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व सांस्कृतिक विभाग यांचे विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन.ई., पर्यवेक्षक डी. टी. जोरे, के.जी.जोपळे, लाइफ मेंबर आर.के.चांदे यांनी अभिनंदन केले.


















































































































No comments:

Post a Comment