Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday 17 July 2022

नवोदय निकाल

 *विंचूर विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थी खोंडे दिव्येश राहुल व चव्हाण पार्थ दत्तात्रय यांनी इयत्ता पाचवी नवोदय पात्र परीक्षेत उत्तुंग यश संपादन करीत गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळविला. या  विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय खेडगाव येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, नवोदय विभाग प्रमुख श्रीम.पवार ए.एम. व सर्व मार्गदर्शक शिक्षक सोनवणे जे.बी, नागणे बी.आर., निकम के.एम., चितुडकर ए.डी., शिंदे जे.एस. यांचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष कैलास सोनवणे, सदस्य पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मान्यवर, पत्रकार तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, संस्थेचे लाइफ मेंबर आर.के.चांदे, पर्यवेक्षक डी.टी. जोरे व के.जी. जोपळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.






No comments:

Post a Comment