Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 6 September 2022

स्वातंत्र्य दिन -15 ऑगस्ट

*विंचूर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा....*

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये 76 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले व स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य अनिल दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीतांच्या गजरात ध्वजास मानवंदना देण्यात आली. कु. साधना निकम हिने संविधान वाचन केले. 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपशिक्षक साळुंके ए. एन. व नववीच्या विद्यार्थ्यांकडून गरीब विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप करण्यात आले. उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. अर्धाकृती कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा बांधकामासाठीचे भूमिपूजन स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रभातफेरीचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्या सौ.सुमन मधुकर दरेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषा व घोषणांच्या गजरात गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पंढरीनाथ दरेकर, सरपंच सचिन दरेकर, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, इफकोच्या संचालिका साधना जाधव तसेच ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन विकास समितीचे सदस्य, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी, रयतसेवक, पत्रकार, डॉक्टर, विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन संस्थेचे लाईफ मेंबर आर.के. चांदे व एस. एस. कोकणी यांनी केले.

















































































































































 

No comments:

Post a Comment