Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 6 September 2022

कुमारावस्थेतील मुलींसाठी समुपदेशन

 *विंचूर विद्यालयामध्ये कुमारावस्थेतील मुलींसाठी समुपदेशन संपन्न.....*

         कुमाराअवस्थेत मुलींमध्ये अनेक शारीरिक व भावनिक बदल घडून येतात. त्यामुळे त्यांना संतुलित आहार व योग्य मार्गदर्शनाची गरज असते, असे प्रतिपादन डॉ. स्मिता तासकर यांनी केले. विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या समुपदेशन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी कुमारावस्थेत होणारे शारीरिक बदल, मुलींच्या अडचणी व समस्या, त्यासंदर्भात घ्यावयाची काळजी, शरीराला असलेली पाण्याची व व्यायामाची गरज अशा विविध मुद्द्यांवर सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी शाल, श्रीफळ देऊन व आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. स्मिता तासकर यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका व्ही.एस.कुलकर्णी यांनी केले. उपशिक्षिका व्ही.आर.दिघे यांनी सूत्रसंचालन  व आभार प्रदर्शन बी.आर. नागणे यांनी केले. या कार्यक्रमास  उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख आर.पी.सरोदे यांनी केले.
















No comments:

Post a Comment