Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 6 September 2022

गोपाळकाला- दहीहंडी

*विंचूर विद्यालयात गोपाळकाला- दहीहंडी कार्यक्रम संपन्न.....*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात श्रीकृष्ण जन्म-गोपाळकाला निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची वेशभूषा परिधान केली.  विद्यार्थ्यांनी जय राधा-कृष्णाच्या गजरात विविध भावगीते व गवळणीच्या सुरावर टिपरी नृत्य सादर केले. श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केलेल्या गोविंदांनी याप्रसंगी दहीहंडी फोडली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख के.एम.निकम, उपशिक्षिका ए.ए.पवार यांनी केले. यासाठी विद्यालयाच्या सर्व उपशिक्षिका व इयत्ता आठवी ड च्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.













































No comments:

Post a Comment