Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 6 September 2022

शालेय मंत्रिमंडळ निवडणूक

 *विंचूर विद्यालयात शालेय मंत्रिमंडळासाठी निवडणूक...*

रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने शालेय मंत्रिमंडळासाठी निवडणूक नुकतीच घेण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला व निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेतला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे भूमिका बजावली. मतदानानंतर मतमोजणी करण्यात आली .विद्यालयातील विद्यार्थी अमोल वाघ- मुख्यमंत्री, अक्षय वाघ -उपमुख्यमंत्री, दीपिका उगले -अभ्यासमंत्री, प्रांजल जेऊघाले -सांस्कृतिक मंत्री, यश दरेकर- क्रीडामंत्री, ओम सोनवणे -शिस्त मंत्री, कृष्णा मुदगुल -अर्थमंत्री, स्मृती कडलग- सहलमंत्री, महेश गावडे -आरोग्य मंत्री यांची शालेय मंत्रिमंडळ पदी निवड झाली. याप्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थी व नवनियुक्त शालेय मंत्रिमंडळ यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी विद्यालयाचे उपशिक्षक एन.बी.बोरसे, व्ही.सी.भोसले, पी.ए.सरोदे, एस.एस.कोकणी, यु.ए.सारुक्ते, व्ही.पी.गावित, व्ही.जे.कांबळे, उपशिक्षिका व्ही.आर.दिघे, जे.एस.शिंदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे व के.जी.जोपळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
















No comments:

Post a Comment